🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध एक पूर्व नियोजित कसोटी सामना खेळणार आहे. भारतीय संघाला ही कसोटी मालिका जिंकण्यासाठी सामना अनिरणीत राखणे गरजेचे आहे. इंग्लंड संघाने नुकतेच त्यांच्या घरच्या मैदानावर न्यूझीलंडला वाईट वॉश दिला आहे. या कसोटी सामन्या अगोदर इंग्लंडच्या माजी कर्णधाराने उलट आपल्या संघाला सावध केले आहे. तो म्हणतो की न्यूझीलंडच्या विपरीत, भारतीय संघामध्ये स्टार खेळाडूंचा भरणा आहे. जे इंग्लंड संघासाठी एक कठीण आव्हान असणार आहे.
माजी कर्णधार केविन पीटरसन म्हणाला की, “इंग्लंड संघाचे फलंदाज झटपट धावा करण्याच्या उद्देशाने खेळतील. मात्र यामुळे भारतीय गोलंदाजांवर कोणताही परिणाम जाणवणार नाही. रवी जडेजा एक अप्रतिम फिरकी गोलंदाज आहे. तो फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यात पटाईत आहे. कसोटी संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराह याकडे एक सुवर्ण संधी म्हणून बघेल.”
इंग्लंडच्या माजी कर्णधाराने भारताच्या फलंदाजीबद्दल बोलताना, संघातील मोठ्या खेळाडूंची नावे घेतली आणि सांगितले की यजमानांना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. “न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंड संघाने अतिशय चांगले कसोटी क्रिकेट खेळले आहे. परंतु रोहित शर्मा चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि इतर काही नावे आहेत, ते सर्व वेगवेगळ्या प्रकारचे खेळाडू आहेत.” भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने या सामन्यात खेळणार नसल्याचे समजले आहे.
“न्यूझीलंड हे जागतिक कसोटी चॅम्पियन आहेत हे मला नेहमीच आश्चर्यचकित करते. असे सांगून त्यांचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही, कारण त्यांनी काहीतरी केले पाहिजे जेणेकरून ते त्यांच्या संघाची चांगली कामगिरी करू शकतील. केन विल्यमसनशिवाय दुसरे कोण आहे? आणि ट्रेंट बोल्ड यांना सोडलं तर, न्यूझीलंड संघामध्ये स्टार क्वालिटीची कमतरता आहे.”
न्यूझीलंड संघाबद्दल बोलताना पीटरसन म्हणाला की, “डॅरेल मिशेलने आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. परंतु त्याला ही कामगिरी दीर्घकाळ टिकवून ठेवावी लागेल, तरच त्याचे नाव जगातील मोठ्या फलंदाजांमध्ये सामील होईल. त्याचबरोबर या संघातील गोलंदाज टीम जाऊ दिला मी वेगवान गोलंदाज मानत नाही.”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
