मुंबई : गेले १० दिवस सुरु असलेला सत्तासंघर्ष काल अखेर संपला. शिवसेनेच्या अनेक आमदारांसह ‘बंडखोर’ झालेले शिंदे यांनी आता भाजपसोबत जात ही राजकीय लढाई जिंकली आहे. महाराष्ट्राचा हा राजकीय खेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिंकल्याचे मानले जात आहे. काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी काल रात्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.
यानंतर आता हा सत्तासंघर्ष मिटताना दिसत होता. पण आता धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडणार का, अशा चर्चा सुरू होऊ लागल्या आहेत. धनंजय मुंडे यांनी काल रात्री उशिरा फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भेटीसाठी गेले होते. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. आता पुढे राजकारणात कोणता भूकंप येणार, याबाबत चर्चा होण्यास सुरवात झाली आहे. तसेच धनंजय मुंडे भाजपमध्ये जाणार का ? असा चर्चा देखील सुरु झाल्या आहेत.
यानंतर धनंजय मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुंडे म्हणाले कि, उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल आपण फडणवीसांची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच एकनाथ शिंदे सध्या गोव्यात आहेत. मात्र ते जेव्हा मुंबईत परत येतील, तेव्हा त्यांची भेट घेऊन आपण त्यांचंही अभिनंदन करणार असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं. मात्र सध्या या दोघांच्या भेटीबद्दल अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

