🕒 1 min read
मुंबई : गेले १० दिवस राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला होता. शिवसेनेतील अंर्तगत बंडखोरीनंतर ठाकरे सरकार कोसळलं. यानंतर महाराष्ट्राला एकनाथ शिंदे हे नवे मुख्यमंत्री मिळाले. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. काल रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत रायगडमधील महाड येथे सभा घेणार आहेत.
तर या सभेआधीच शिंदे गटाचे बंडखोर नेते विकास गोगावले यांनी संजय राऊत यांना खुले आव्हान दिले आहे. महाड येथील सभेसाठी संजय राऊत यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांविना यावे. राऊत महाडमध्ये विनासुरक्षेचे आल्यास त्यांना शिवसैनिक ‘प्रसाद’ देण्यास मागे पुढे पाहणार नाही, असं गोगावले म्हणाले आहेत. तर याआधी संजय राऊत यांचे एक ट्विट खूपच व्हायरल झाले होते. ट्विटमध्ये राऊत म्हणाले होते की कुठपर्यंत गुवाहाटीत लपणार? चौपाटीत यावेच लागेल, असा निशाणा शिंदे गटावर साधला होता.
दरम्यान, शिंदे सरकारची काल पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला आणि परिस्थितीची माहिती घेतली. प्रलंबित प्रश्न, योजनांना पुढे घेऊन जाऊ असे शिंदे यांनी सांगितले आहेत. तसेच जाता जाता मुख्यमंत्री म्हणाले कि, माजी मुख्यमंत्रीही सोबत आहेत, त्यामुळे जोरदार बॅटिंग करु.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
