Share

Sanjay Raut : काळजी करू नका; उद्धव ठाकरे, शरद पवार, ममता बॅनर्जींना टॅग करत संजय राऊतांचं ट्वीट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : जवळपास १० दिवस शिवसेनेच्या अनेक आमदारांसह ‘बंडखोर’ झालेले शिंदे यांनी आता भाजपसोबत जात ही राजकीय लढाई जिंकली आहे. महाराष्ट्राचा हा राजकीय खेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिंकल्याचे मानले जात आहे. यानंतर काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडला. याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होत.

मात्र राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता संजय राऊत चौकशीसाठी गेलेले नव्हते. मात्र आता त्यांनी याचविषयी एक ट्वीट करत माहिती दिली आहे. मी आज दुपारी १२ वाजता ईडीसमोर हजर होणार आहे. मला जारी करण्यात आलेल्या समन्सचा मी आदर करतो आणि तपास यंत्रणांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. मी शिवसेना कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयात जमू नये असे आवाहन करतो. काळजी करू नका, असं ट्विट केलं आहे. यानंतर या ट्वीटमध्ये त्यांनी शरद पवार, ममता बॅनर्जी, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंना टॅग केलं आहे.

दरम्यान, काल महाराष्ट्र राज्याला ३० वे नवे मुख्यमंत्री मिळेल. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या दोघांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सुरवातीला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटत होत. मात्र शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर झालं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!