मुंबई : भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांनी रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या टी-२० फॉरमॅटमधील फलंदाजीच्या दृष्टिकोनावर (batting approach) प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये या तिघांच्या कामगिरीने कपिल खूपच निराश झाले आहेत. आपल्या कर्णधारपदाखाली टीम इंडियाला पहिल्यांदाच विश्वविजेता बनवणाऱ्या कपिल यांनी सांगितले, ”तिघेही मोठे खेळाडू आहेत आणि दबावाखाली वेगाने धावा करू शकतात, पण जेव्हा संघाला त्यांच्याकडून धावांची गरज असते तेव्हा तिघेही आऊट होतात आणि पॅव्हेलियनमध्ये परततात.”
नुकत्याच संपलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२२मध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माच्या फॉर्मने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली आहे, जरी केएल राहुल चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक खेळला जाणार असल्याने या तिघांच्या फलंदाजीमुळे टीम इंडियावर दबाव वाढू शकतो, असे कपिल यांचे मत आहे.
When you need runs from them, they all get out – Kapil Dev on Virat, Rohit and Rahul https://t.co/ms6GcUe9iR
— Crictoday (@crictoday) June 5, 2022
कपिल देव म्हणाले, ”तिघांचीही नावे मोठी आहेत, त्यामुळे त्यांच्यावर खूप दबाव आहे, जे होऊ नये. तुम्ही निर्भय क्रिकेट खेळले पाहिजे. हे तिघेही असे खेळाडू आहेत जे १५०-१६०च्या स्ट्राइक रेटने धावा करू शकतात. जेव्हा आपल्याला त्यांच्याकडून धावांची गरज असते तेव्हा ते आऊट होतात. जेव्हा धावा जलद कराव्या लागतात तेव्हा ते बाद होतात आणि त्यामुळे दबाव वाढतो. एकतर तुम्ही स्ट्रायकर म्हणून खेळता किंवा अँकर म्हणून.”
राहुलचा उल्लेख करताना कपिल देव म्हणाले, ”जर तुम्ही पूर्ण २० षटके फलंदाजी करून ६० धावा करत असाल तर तुम्ही संघाला न्याय देत नाही. जर या तिघांनी आपल्या फलंदाजीचा दृष्टिकोन बदलला नाही तर भारताला टी-२० क्रिकेटसाठी आणखी फलंदाज तयार करण्याची गरज आहे. मला वाटते की दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे, आणि जर तसे झाले नाही तर तुम्ही खेळाडू बदलले पाहिजेत. एखाद्या मोठ्या खेळाडूचा मोठा प्रभाव अपेक्षित आहे. केवळ नाव मोठे आहे म्हणून काही होत नाही. तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

