मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी केलेला विरोध आजही चर्चेत आहे. अशातच आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे काही नेते अयोध्येला जाणार आहेत, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल (५ जून) रोजी माध्यमांशी बोलताना दिली. यासंदर्भात आज पुन्हा संजय राऊत यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
“जय श्रीराम… 15 जुन, चला अयोध्येला. आदित्य ठाकरे शेकडो शिवसैनिकांसह अयोध्येत येणार, रामलल्लाचे दर्शन घेणार”. असे ट्विट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.
जय श्रीराम…
15 जुन
चलो अयोध्या..
श्री आदित्य ठाकरे जी शेकडो शिवसैनिकों क साथ अयोध्या आयेंगे.. रमलल्ला के दर्शन करेंगे.. pic.twitter.com/PtjZuwVGGo— Sanjay Raut (@rautsanjay61) June 6, 2022
याआधी संजय राऊत काय म्हणाले होते?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा करणार असल्याचं जाहीर केलं होते. त्याआधी शिवसेनेचे नेतेही अयोध्येला जाणार असल्याची माहिती मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली होती. आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया देत राज ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता.आम्ही फक्त राजकारणापुरतं अयोध्येला जात नाही तर शिवसेना आणि अयोध्याचं पूर्वीपासूनच भावनिक नातं आहे, असे संजय राऊत म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

