Share

मंत्रिमंडळाची आज होणार बैठक; राज्यसभा निवडणुक व ‘मास्कसक्ती’वर चर्चा होण्याची शक्यता!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  राज्यात काल (५ जून) रोजी १ हजार ४९४ नवीन रुग्णांचे निदान झाले तर एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मागील काही दिवसांपासून रुग्णांचे वाढ होण्याचे प्रमाणही वाढले आहे. याचपार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच आजच्या बैठकीत कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, मास्कसक्ती आणि आगामी राज्यसभेची निवडणुक या विविध विषयांवर चर्चा होणार, अशी शक्यता देखील वर्तविली जात आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयात दुपारी ४ वाजता होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अपक्ष आमदारांशी देखील संवाद साधणार आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारच्या बाजूनं मतदान करा, असं आवाहन उद्धव ठाकरे करणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पुणे महापालिका निवडणूक संदर्भात संजय राऊतांचा दावा –

पुण्यात एकूण ४२ जागा आहेत. या ४२ जागांवर शिवसेना येणार. पुणे महापालिकेवर भगवा फडकवणारच, असा दावा पुणे महापालिका निवडणूक संदर्भात संजय राऊत यांनी केला आहे. तसेच नगरसेवकांनी सेवक म्हणून काय काम करावे ही बाळासाहेबांची जी संकल्पना होती ते आपले पुण्यातील नगरसेवक करत आहेत. आणि टिकून राहिले. त्यामुळे लढणाऱ्या शिवसैनिकालाच जागा मिळणार. आपण सर्व टिकून राहिलो. जे उडून गेले ते कावळे नाही तर आपण मावळ्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!