Share

‘इंदिरा गांधींनी खलिस्तान्यांना डासांप्रमाणे चप्पलेखाली चिरडलं अन्…’

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangna ranaut ) आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत असते. नुकतीच तिने भारताला मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून भीक असल्याचं म्हंटल होतं. तिच्या या वक्तव्यावरुन सर्व स्तरातून तिच्यावर टीकेची झोड उठवली गेली. तिच्या वक्तव्याचं समर्थन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केलं. त्यांनाही अनेक टीकाकारांना सामोरं जावं लागलं.

कंगना या वक्तव्यावरच थांबली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रद्द केलेल्या कृषी कायद्यांवरही भाष्य केलं होतं. पंतप्रधानांच्या निर्णयावर कंगनाने नाराजी दर्शवली होती. या वक्तव्यानंतर तिने आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कंगनाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती.

कंगनाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने संपूर्ण शीख समुदायाला खलिस्तानी म्हंटल आहे. ‘इंदिरा गांधी यांनी खलिस्तानी दहशतवाद्यांना आपल्या चपलीखाली डासांप्रमाणे चिरडलं’, असं वक्तव्य कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये केलं आहे. यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. तिच्या विरोधात पोलीस तक्रार करण्यात आली असून गुन्हा नोंदवण्याची मागणी होत आहे. कंगनाच्या विरोधात दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार इन्स्टाग्रामवर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आली आहे.

कंगनाच्या विरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार ही मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील सायबर सेलमध्ये करण्यात आली आहे. या शीख समुदायाच्या मते, कंगनाने जाणीवपूर्वक शेतकरी आंदोलन हे खलिस्तानी आंदोलन असल्याचे वर्णन केले आहे. तसेच तिने शीख समुदायविरोधात वक्तव्य करतेवेळी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषेचा वापर केला आहे, असे शीख समुदायाचे म्हणणे आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!