🕒 1 min read
मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चालल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मलिक यांची मुलगी सना मलिक-शेख (Sana Malik-Shaikh) यांनी एक ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे.
ट्विटमध्ये सना यांनी समीर वानखेडे यांच्या एका कागदपत्राचा फोटो अपलोड केला असून हा फोटो समीर वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचे कथित मॅरेज सर्टीफिकेट असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच २६ डिसेंबर २००६ रोजी हे सर्टीफिकेट जारी करण्यात आल्याचे यावर नमूद करण्यात आले आहे. सोबतच हे कथित मॅरेज सर्टिफीकेट ट्विटरवर अपलोड करताना सना मलिक यांनी पूर्ण सत्य जनतेसमोर देत आहे, असे कॅप्शन दिले आहे. यापूर्वी समीर वानखेडे यांची लग्नपत्रिका समोर आली होती. या लग्नपत्रिकेमध्ये दाऊद वानखेडे असा उल्लेख केलेला आढळतो. याचाच आधार घेत सना मलिक यांनी पूर्ण सत्य देत असल्याचे म्हणत लग्नाचा दाखला सोशल मीडियावर सार्वजनिक केला आहे. यापूर्वी समीवर वानखेडे यांचा निकाहनामा समोर आला होता.
Iska Aadha sach public mein tha.. poora de rahi hoon.. https://t.co/AZW1jowJlg pic.twitter.com/u5O30zv4pP
— Sana Malik-Shaikh ثنا ملک-شیخ सना मलिक-शेख (@sanamalikshaikh) November 20, 2021
दरम्यान, यापूर्वी समीर वानखेडे हे १७ वर्षे, १० महीने, १९ दिवसांचे असताना त्यांना उत्पादन शुल्क खात्यातून दारू विक्रीचा परवाना मिळाला. समीर यांचे वडील दाऊद वानखेडे हे उत्पादन शुल्क विभागात नोकरीला होते. पदाचा गैरवापर करून त्यांनी १९९७ साली अल्पवयीन मुलाच्या म्हणजेच समीर वानखेडे यांच्या नावाने दारू विक्रीचा परवाना मिळवून घेतला होता, असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर केला होता.
महत्वाच्या बातम्या:
-
- रामदास कदमांचा पत्ता कट; शिवसेनेकडून ‘या’ २ नेत्यांना मिळाली विधान परिषदेची उमेदवारी
- ‘शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य लढून मिळवलं, भिकेत मिळालं नाही’
- महाविकास आघाडीचे फसवे आकडे, भाजपचाच…; चंद्रकांत पाटलांचा दावा
- …म्हणूनच मला आजची सकाळ शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते- संजय राऊत
- ‘त्या’ सेलिब्रिटींनी आता शेतकऱ्यांचं अभिनंदन करावं- सचिन सावंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
