बुलडाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(PM Narendra Modi) तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. शुक्रवारी(१९ नोव्हें.) सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली. त्यात त्यांनी तीन कायदे मागे घेतल्याची घोषणा केली तसेच देशाची माफीही मागीतली आहे. या तीन कृषी कायद्यांचे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही. असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली. सोबतच वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदींनी केली. दरम्यान, भाजपाने आतातरी हुकूमशाही बंद करावी, जनतेपेक्षा सरकार मोठे नसते हे लक्षात घेतले पाहिजे अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांनी भाजपावर केली आहे.
खामगावमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना थोरात म्हणाले की,’केंद्र सरकारने केलेले ही तीनही कृषी कायदे शेतकरी विरोधी होते. हे कायदे रद्द करण्याची मागणी अनेकदा शेतकऱ्यांनी केली. मात्र कायदे रद्द होत नसल्याचे दिसताच या कायद्यांविरोधात शेतकरी एकवटले आणि दिल्लीमध्ये तब्बल एक वर्ष आंदोलन चालले. याकाळात अनेकदा आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न भाजपाने केला, मात्र त्यांना यश आले नाही. अखेर सरकार झुकले शेतकऱ्यांचा विजय झाला आणि कायदे मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. या काळात काँग्रेस शेतकऱ्यांच्यासोबत होती आणि यापूढेही असेल.’
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी शेतकरी कायदे रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर, विरोधकांकडून त्यांच्यावर टीकास्त्रांचा वर्षाव केला जात आहे. पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तसेच येत्या काळात अनेक राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. भाजपाने निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेतला असल्याची टीका काँग्रस आणि राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- समीर वानखेडेंच्या विवाहाचा दाखला ट्विट करत, नवाब मलिकांच्या मुलीचा नवा दावा
- ‘शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य लढून मिळवलं, भिकेत मिळालं नाही’
- महाविकास आघाडीचे फसवे आकडे, भाजपचाच…; चंद्रकांत पाटलांचा दावा
- …म्हणूनच मला आजची सकाळ शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते- संजय राऊत
- ‘त्या’ सेलिब्रिटींनी आता शेतकऱ्यांचं अभिनंदन करावं- सचिन सावंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

