मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत असते. नुकतीच तिने भारताला मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून भीक असल्याचं म्हंटल होतं. तिच्या या वक्तव्यावरुन सर्व स्तरातून तिच्यावर टीकेची झोड उठवली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रद्द केलेल्या कृषी कायद्यांवरही भाष्य केलं होतं. पंतप्रधानांच्या निर्णयावर कंगनाने नाराजी दर्शवली होती. या वक्तव्यानंतर तिने आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
कंगनाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने संपूर्ण शीख समुदायाला खलिस्तानी म्हंटल आहे. कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये इंदिरा गांधी यांनी खलिस्तानी दहशतवाद्यांना आपल्या चपलीखाली डासांप्रमाणे चिरडल्याचं वक्तव्य केलं आहे. यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. तिच्या विरोधात पोलीस तक्रार करण्यात आली असून गुन्हा नोंदवण्याची मागणी होत आहे. अभिनेता कमाल आर खान याने कंगनाच्या अटकेची मागणी केली आहे.
Kangana Ranaut Khuleaam Maar Kaat Aur नरसंहार Ki Baat Kar Rahi Hai, Fir Bhi Koi Law Nahi Hai Jo Kangana Par Laagu Hota Ho. Aisa Kaise? @MumbaiPolice @PunjabPoliceInd! Koi Aur Aisa post Karta, Toh Ab Tak Jail Main Hota. Why Law is not same for everyone? It’s not done!
— KRK (@kamaalrkhan) November 20, 2021
कंगना रणौत उघडपणे मारणे, कापणे आणि हिंसाचार याबद्दल बोलत असते. मात्र आतापर्यंत असा कोणताही कायदा नाही जो कंगनावर लागू होतो. असे कसे? इतर कोणी जर अशी पोस्ट केली असती तर तो आतापर्यंत जेलमध्ये असतात. कायदा सर्वांवर लागू होत नाही का? असे प्रश्न कमाल आर खानने उपस्थित केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- गरज पडल्यास रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा आणू; भाजप खासदाराचं खळबळजनक वक्तव्य
- महादेव जानकरांचा भाजपाला घरचा आहेर; म्हणाले,’आमचं सरकार असतानाही…
- समीर वानखेडेंच्या विवाहाचा दाखला ट्विट करत, नवाब मलिकांच्या मुलीचा नवा दावा
- भाजपाने आतातरी हुकूमशाही बंद करावी- बाळासाहेब थोरात


