🕒 1 min read
Jitendra Awhad | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावर प्रतिक्रिया देत असताना भाजप (BJP) नेते आणि महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना अश्रू अनावर झाले. यानंतर आता राष्ट्रवादी (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भोसले यांचे आभार मानले आहेत.
साताऱ्याचे गादीचे वारसदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत जी भूमिका घेतली त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो. खरंतर या आधीच त्यांनी भूमिका घेतली असती तर आज कोणाची छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याची हिम्मतच झाली नसती, असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
त्याकाळात शिवाजी महाराजांनी समाजाचा विचार केला. आज सर्व व्यक्तिकेंद्रीत झाले आहेत. कोणीच अपवाद नाही. राष्ट्रीय पक्ष असो की प्रादेशिक पक्ष. असंच चालत राहीलं तर कितपत चालणार. या देशाचे तुकडे व्हायला किती वेळ लागणार?, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला.
तसेच, देश परदेशातून लोक येतात तेव्हा त्यांच्या कानावर शिवाजी महाराजांचं नाव पडतं. कशाला पाहिजे, जाऊ द्याना कशाला हवं बेगडी प्रेम. रेल्वे टर्मिनसला तरी का नाव द्यायचं. शिवजयंती तरी करा साजरी करायची?, असे सवाल करत हे बोलताना उदयनराजेंना अश्रू अनावर झाले. त्यांनी तोंडाला रुमाल लावला. कंठ दाटला. मेलो असतो तर बरं झालं असतं. अशा व्यक्तीविरोधात कारवाई करत नसाल तर कुणालाही शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असं देखील ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrashekhar Bawankule | “…त्यामुळे ते स्वत:ची उंची कमी करून घेत आहेत”, अजित पवारांना चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर
- Sanjay Raut | संजय राऊतांच्या अडचणी वाढणार! कोर्टाने बजावलं समन्स, हजर न राहिल्यास होणार अटक
- Baba Ramdev | “…तर दिलगिरी व्यक्त करतो”; महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची माफी
- Chhagan Bhujbal | “देवी सरस्वतीने किती शाळा काढल्या? किती लोकांना त्यांनी…”, छगन भुजबळांचं पुन्हा वादग्रस्त विधान
- Udayanraje Bhosale | “महापुरुषांचा अवमानही देशद्रोहच ठरवा”; कायद्यात तरतूद करण्याची उदयनराजे भोसले यांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
