Share

Chhagan Bhujbal | “देवी सरस्वतीने किती शाळा काढल्या? किती लोकांना त्यांनी…”, छगन भुजबळांचं पुन्हा वादग्रस्त विधान

Published On: 

🕒 1 min read

Chhagan Bhujbal | मुंबई : काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देवी सरस्वतीवरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर आंदोलन केलं होतं. अशातच छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा देव सरस्वती बाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यामुळे नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे.

यावेळी, सरस्वती देवीने किती शाळा काढल्या? किती लोकांना त्यांनी शिक्षण दिलं? जर त्यांनी शिक्षण दिलं तर मग महात्मा फुलेंना का पाऊल टाकावं लागलं? ब्राम्हण समाजात (Political News) फक्त पुरुषांना शिक्षण दिलं जायचं. ते ही महिलांना शिक्षण देत नव्हते. म्हणून म्हणतो मी फक्त सरस्वतीची पूजा का? त्यामुळं सावित्रीबाई फुलेंना स्थान द्या, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

यादरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी छत्रपतींचा, सावित्रीबाईसह अनेकांचा अपमान करत आहेत. आता रामदेव बाबादेखील महिलांबाबत भयंकर बोलले. त्यावेळी अमृता फडणवीस त्याच कार्यक्रमात उपस्थित होत्या. आज त्या म्हणाल्या की सभ्य भाषेत बोलायला हवं होतं. म्हणजे ते असभ्य भाषेत बोलले हे त्यांच्या बोलण्यावरुन सिद्ध झालं आहे. महत्वाचं म्हणजे यांना काहीही बोलण्याचा कोणी अधिकार दिला. यांचं धारिष्ट्य होतं कसं? आज छत्रपतींचं राज्य असायला हवं. मग बघा यांचं धाडस होतं का?, असं देखील भुजबळ म्हणाले.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो प्रत्येक ठिकाणी असतो याचा आम्हाला आनंद आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना स्थान आहे. त्याबाबत ही काही दुमत नाही, पण महात्मा फुलेंच्या बाबतीत असं घडत नाही. ते दुर्लक्षित असल्याचंही ते म्हणाले

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!