🕒 1 min read
Baba Ramdev | मुंबई : ठाण्यामध्ये महिलांसाठी योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महिलांच्या कपड्यांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे बाबा रामदेव चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यानंतर राज्य महिला आयोगाने यासंदर्भात बाब रामदेव यांना नोटीस पाठवली होती. याप्रकरणी आता बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी माफी मागितली आहे.
या संदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणाल्या की, “बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात महिलांसंबंधी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते. या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांना याबाबतीत आपला खुलासा दोन दिवसाच्या आत सादर करण्यासाठी नोटिस पाठवली होती. याबाबत त्यांचा खुलासा कार्यालयाला प्राप्त झाला असून, केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.”
बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात महिलांसंबंधी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते. या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांना याबाबतीत आपला खुलासा दोन दिवसाच्या आत सादर करण्यासाठी नोटिस१/२ pic.twitter.com/umI27luSK7
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 28, 2022
“ठाण्याच्या कार्यक्रमात मी एक तास बोलत होतो. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला. मला जे बोलायचं नव्हते, असा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. माझ्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर दिलगीरी व्यक्त करतो,” असे बाबा रामदेव यांनी महिला आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटल्याचं, रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
काय म्हणाले होते रामदेव बाबा?
ठाण्यामध्ये महिलांसाठी योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. योगा कार्यक्रमात महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते आणि त्यानंतर महिलांसाठी महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. या महासंमेलनासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र दोन्ही कार्यक्रम सलग असल्याने महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. याबाबत बाबा रामदेव यांनी म्हटलं की साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही अडचण नाही. आता घरी जाऊन साड्या नेसा. पुढे रामदेव बाबा म्हणाले की, “महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटतात, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने तर काही नाही घातलं तरी त्या चांगल्या दिसतात.”
महत्वाच्या बातम्या :
- Chhagan Bhujbal | “देवी सरस्वतीने किती शाळा काढल्या? किती लोकांना त्यांनी…”, छगन भुजबळांचं पुन्हा वादग्रस्त विधान
- Udayanraje Bhosale | “महापुरुषांचा अवमानही देशद्रोहच ठरवा”; कायद्यात तरतूद करण्याची उदयनराजे भोसले यांची मागणी
- Udayanraje Bhosale | “मेलो असतो तर बरं झालं असतं…”, भर सभेत उदयनराजे भोसले यांना अश्रू अनावर
- MNS | “संजय राऊतांच्या रुपात हा कादर खान आता…”; मनसेचा जोरदार हल्लाबोल
- Bhagatsingh Koshyari | राज्यपालांची पदमुक्त होण्याची इच्छा? राजभवनाकडून स्पष्टीकरण; म्हणाले,
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
