Share

Sanjay Raut | संजय राऊतांच्या अडचणी वाढणार! कोर्टाने बजावलं समन्स, हजर न राहिल्यास होणार अटक

Published On: 

Sanjay Raut | मुंबई : काही दिवसांपुर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जामीन मिळाला आहे. एवढंच नाही तर त्यांना बेकायदा अटक करण्यात आली असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. अशातच त्यांच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. संजय राऊतांनी 30 मार्च 2018 मध्ये बेळगावात भाषण केलं होतं. त्याच भाषणात त्यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. यावरुनच कोर्टाने संजय राऊत यांना समन्स बजावलं आहे.

बेळगावातील स्थानिक पोलिसांनीच संजय राऊत यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवला असल्याची माहिती समोर आली आहे. बेळगाव-महाराष्ट्र सीमावादावरुन दोन्ही राज्यांमधील राजकीय वातावरण तापलंय. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील 40 गावांवर दावा सांगितलाय. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांकडून कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आलाय. असं असताना राऊतांना कोर्टाचे समन्स आल्याने विविध चर्चांना उधाण आलंय.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेलं वक्तव्य चार दिवसांपूर्वीच आहे. सोलापूर सांगलीचा भाग कर्नाटकात घेण्यासंदर्भात. त्यांनी विषयाला तोंड फोडलं. आमच्यासारख्या लढणाऱ्या लोकांना बेळगावात बोलावून हल्ला करण्याचं कारस्थान आहे. हे कारस्थान शिजताना दिसतं. याची दखल महाराष्ट्र सरकारने घ्यायला हवी, असं संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!