🕒 1 min read
Udayanraje Bhosale | मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत भाजपचे खासदार उदयनराजे यांनी आपली भूमिका मांडली. महापुरुषांचा अवमान केला जातो तो देशद्रोहच ठरवा आणि त्या प्रकारे कायद्यात तरतूदच करा अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केली आहे.
“त्या काळात शिवाजी महाराजांनी समाजाचा विचार केला. आज सर्व व्यक्तिकेंद्रीत झाले आहेत. कोणीच अपवाद नाही. राष्ट्रीय पक्ष असो की प्रादेशिक पक्ष. असंच चालत राहीलं तर कितपत चालणार. या देशाचे तुकडे व्हायला किती वेळ लागणार?”, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला.
यावेळी प्रतिक्रिया देत असताना उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले, देश परदेशातून लोक येतात तेव्हा त्यांच्या कानावर शिवाजी महाराजांचं नाव पडतं. कशाला पाहिजे, कशाला हवं बेगडी प्रेम?, रेल्वे टर्मिनसला तरी का नाव द्यायचं?, शिवजयंती तरी का साजरी करायची?, असेही सवाल त्यांनी केलेत.
यानंतर त्यांनी तोंडाला रुमाल लावला आणि त्यांना अश्रू अनावर झाले. मेलो असतो तर बरं झालं असतं, अशा व्यक्तीविरोधात कारवाई करत नसाल तर कुणालाही शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असं देखील ते म्हणाले. तुम्ही इतिहासाची मोडतोड करता. त्यामुळे मागून येणाऱ्या पिढ्यांना हाच खरा इतिहास आहे असं वाटू लागतं त्यामुळे महापुरुषांची बदनामी आणि त्यांची अवहेलना करणे थांबवण्याची त्यांनी सरकारकडे कळकळीची विनंती केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Udayanraje Bhosale | “मेलो असतो तर बरं झालं असतं…”, भर सभेत उदयनराजे भोसले यांना अश्रू अनावर
- MNS | “संजय राऊतांच्या रुपात हा कादर खान आता…”; मनसेचा जोरदार हल्लाबोल
- Bhagatsingh Koshyari | राज्यपालांची पदमुक्त होण्याची इच्छा? राजभवनाकडून स्पष्टीकरण; म्हणाले,
- Raj Thackeray | उद्धव ठाकरे यांच्या अंगावर एकतरी केस आहे का? – राज ठाकरे
- Supriya Sule | “राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी…”, सुप्रिया सुळेंचं विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
