मुंबई : एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंत्तर महाराष्ट्रात भाजपला त्यांनी धक्के देण्यास सुरुवात केली होती. शेकडो कार्यकर्त्यांनी खडसेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची वाट धरली होती.
त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला उतरती कळा लागल्याचं सांगत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आणखी काही भाजप नेते राष्ट्रवादीत येणार असल्याचं सूचक विधान केलं होतं. आता, भाजपाला सोडचिठ्ठी देणारे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार जयसिंगराव गायकवाड हे आता राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी काल दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील आदी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे.
पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात भाषण करताना गायकवाडम्हणाले, ‘आता मी आलोय साहेब, येणाऱ्यांची मालिका फार मोठी आहे. ते आता सगळेच बाहेर येणार आहेत’ अशी गर्जना करत जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला इशारा दिला आहे. ‘मान-सन्मान नाही, कामाची कदर नाही, केलेल्या कामाचं कौतुक नाही, चांगल्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देत नाहीत, अशा पक्षात कोण राहील? गेली 12 वर्ष भाजपसोबत होतो. राष्ट्रवादी सोडल्याचा मला पश्चात्ताप होतोय. पण आता प्रायश्चित्त करतो आहे. भाजप नेते नितीन गडकरी आमचे मित्र आहेत. पण आज त्यांचीही काय अवस्था आहे हे तुम्हालाही माहिती आहे.’ अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.
भाजपात कामाची कदर नाही, कौतुक नाही. चांगल्या कार्यकर्त्यांचे वाळवंट करण्याचे काम भाजपने केल्याचा आरोप जयसिंगराव गायकवाड यांनी बोलताना केला. जिथे कोंडमारा होतोय त्या पक्षात रहायचं नाही ठरवलं आणि आता राष्ट्रवादीत प्रवेश करुन मोकळा श्वास घेत असल्याचेही जयसिंगराव गायकवाड यांनी सांगितले. सतीश चव्हाण यांना साथ देवून रेकॉर्ड ब्रेक मतदान मिळवून देणार आहे. जी जबाबदारी द्याल ती प्रामाणिकपणे पार पाडेन. आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस असणार आहे असे प्रवेश करताना जयसिंगराव गायकवाड यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन
- अहमद पटेल यांच्या निधनाने अनुभवी, निष्ठावंत व समर्पित नेतृत्व गमावले- बाळासाहेब थोरात
- ‘वीजबिलाविरोधात आंदोलन करणाऱ्यांनी केंद्र सरकारच्या लुटमारीविरोधात आंदोलन करावे’
- ‘मराठी माणसाने महाराष्ट्रात व्यापार उद्योग करणं, हा दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल’
- भाजपच्या जाचाला, त्रासाला कंटाळून प्रवेश केलेल्या गायकवाड यांचे पक्षात स्वागत- जयंत पाटील


