🕒 1 min read
मुंबई: महाराष्ट्रातील विजबील न भरलेल्या शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. ठाकरे सरकारमध्ये शेतकाऱ्यांबद्दल संवेदनशीलता नाही त्यामुळेच अशा सुलतानी पध्दतीने शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे, असा घणाघाती आरोप फडणवीस यांनी केला आहे.
तसेच प्रवीण दरेकर शेतकाऱ्यांबद्दल बोलतात, शेतकऱ्यांची बाजू मांडतात त्यामुळेच सूडबुद्धीने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र सरकारने शेतक-यांच्या विज बिलाचे पैसे महावितरणला देऊन शेतकऱ्यांचे बिल माफ करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागच्या अधिवेशनात आश्वासन दिले होते कि, मे महिन्यापर्यंत शेतकऱ्यांची वीज कापली जाणार नाही. मग आता ठाकरे सरकार ते आश्वासन का पळत नाही असा सवाल त्यांनी या वेळी उपस्थित केला.
काय म्हणाले नितीन राऊत?
विधीमंडळात गदारोळ झाल्यानंतर काही वेळासाठी कामकाज स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वीज तोडणीच्या निर्णय स्थगित करण्यात आला आहे. परंतु अशी विनंती आहे कि, महावितरण कंपनीच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन सर्व ग्राहकांनी महावितरण कंपन्यांची वीज बिले वेळेवर भरावीत आणि महावितरण कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
