Share

कोरोनामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

Published On: 

गुरुग्राम – ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि सोनिया गांधींचे माजी सल्लागार अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. त्यांना ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान बुधवारी (दि. 25 नोव्हेंबर) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल याने ट्विटरवरून याबाबत माहिती दिली.

अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्विट करत सांगितले की, आज पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी वडील अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. त्यांना एका महिन्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्यांच्या अनेक अवयवांनी एकाच वेळी काम करणे बंद केल्यानंतर त्यांच्या शरीराचे अनेक अवयव निकामी होत गेल्यामुळे त्यांची प्रकृती आणखी खालावली आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. तुम्हा सर्वांना मी आवाहन करतो की, कोरोनाच्या गाइडलाइन्सचे पालन करा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा असेही फैजल पटेल म्हणाले.

1 ऑक्टोबरला अहमद पटेल यांनी एक ट्विट करून कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली. त्यानंतर काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल म्हणाले की, मी कोरोना पॉझिटिव्ह झालो आहे, माझी विनंती आहे की जे माझ्याशी जवळचे संपर्क साधतात त्यांनी स्वत: ला आइसोलेट करावे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!