मुंबई – एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंत्तर महाराष्ट्रात भाजपला त्यांनी धक्के देण्यास सुरुवात केली होती. शेकडो कार्यकर्त्यांनी खडसेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची वाट धरली होती.
त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला उतरती कळा लागल्याचं सांगत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आणखी काही भाजप नेते राष्ट्रवादीत येणार असल्याचं सूचक विधान केलं होतं. आता, भाजपाला सोडचिठ्ठी देणारे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार जयसिंगराव गायकवाड हे आता राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
या पक्ष प्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गायकवाड यांचे आपल्या खास शैलीत स्वागत केले.भापच्या जाचाला, त्रासाला कंटाळून जयसिंगराव गायकवाड प्रवेश करत आहेत. त्यांचे राष्ट्रवादी पक्षात स्वागत असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. बीड जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढत आहे. प्रत्येकाने ताकदीने पक्ष वाढवला आहे. जयसिंगराव गायकवाड भाजपात काम करत होते. मात्र भाजप जनतेच्या हिताची कामे करत नाही. हे लक्षात आल्यावर ते पुन्हा राष्ट्रवादीत दाखल होत आहेत. त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. सामान्य माणसाशी जिव्हाळा असणारा नेता आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
पश्चिम महाराष्ट्रासारखी ताकद मराठवाड्यात निर्माण करु – धनंजय मुंडे
पश्चिम महाराष्ट्रात जशी ताकद राष्ट्रवादीची आहे त्याच ताकदीची राष्ट्रवादी मराठवाडयात जयसिंगराव गायकवाड यांच्या प्रवेशाने निर्माण होईल असा विश्वास सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. मला मनापासून आनंद आहे. काकांच्या प्रवेशाने बीड जिल्हयात व मराठवाडयात हत्तीचं बळ मिळाले आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन
- अहमद पटेल यांच्या निधनाने अनुभवी, निष्ठावंत व समर्पित नेतृत्व गमावले- बाळासाहेब थोरात
- ‘वीजबिलाविरोधात आंदोलन करणाऱ्यांनी केंद्र सरकारच्या लुटमारीविरोधात आंदोलन करावे’
- ‘मराठी माणसाने महाराष्ट्रात व्यापार उद्योग करणं, हा दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल’
- लस कधी येणार हे सांगू शकत नाही, पण ती सर्वांना उपलब्ध करून देणार – नरेंद्र मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

