🕒 1 min read
मुंबई: आज अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांना ५ कोटी निधी देणार असल्याची घोषणा केली. यावर भाजपच्या वतीने विदर्भ आणि मराठवाड्यावर अन्याय झाल्याचा आरोप राज्य सरकारवर केला. याप्रकरणी प्रसार माध्यमांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया मागितली होती.
त्यावेळी नाना पटोले म्हणाले कि, जेव्हा फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते, योगायोगाने ते विदर्भाचेच होते, विदर्भाचा सर्वसामान्य आणि रोजगार विषयक, रस्ते विषयक सर्वच गोष्टींचा बॅकलॉग भरून काढायची संधी त्यांना जनतेने दिली होती, परंतु ती संधी त्यांनी घावलली आहे. त्यामुळे त्यांना या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
