मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काल शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं होतं. यानंतर, त्यांना आज दुपारी १२ वाजता पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावलं आहे.
आमदार प्रताप सरनाईक यांना ईडी कार्यालयाने समन्स बजावले आहे. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ते सकाळी ११ वाजता हजर राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पिता-पुत्रांची सोबत चौकशी केली जाण्याची देखील शक्यता आहे. दुसरीकडे, या छापेमारीच्या स्तरावरून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु झालं आहे.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईवरून भाजपला लक्ष्य केलं आहे. “ईडी उत्खनन करत मोहेंजोदारो आणि हडप्पापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे मला, उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा महाविकास आघाडीतील आणखी प्रमुख नेत्यांना ईडीची नोटीस आली, तर धक्का बसणार नाही” असं राऊत म्हणाले.
तर, ‘मराठी माणसाने महाराष्ट्रात व्यापार उद्योग करणं, हा जर दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल, ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून त्यांना खतम करण्याचं धोरण कोणी राबवत असेल, तर हा मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय देऊन उभा राहील’ असं देखील संजय राऊत यांनी ठणकावलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- आमदार-कार्यकर्ते फुटू नयेत म्हणून त्यांना गाजर दाखवावं लागतं; अजिदादांचा भाजपला टोला
- अहमद पटेल यांच्या निधनाने अनुभवी, निष्ठावंत व समर्पित नेतृत्व गमावले- बाळासाहेब थोरात
- ‘वीजबिलाविरोधात आंदोलन करणाऱ्यांनी केंद्र सरकारच्या लुटमारीविरोधात आंदोलन करावे’
- राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का ? राजेश टोपे म्हणाले…
- पुत्रांच्या चौकशीनंतर आता प्रताप सरनाईकांना ईडीने धाडलं बोलावणं


