Share

ऋषभ पंत नाही तर ‘हा’ वेगवान गोलंदाज असेल भारतीय संघाचा उपकर्णधार

Published On: 

मुंबई : विराट कोहलीने भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाची जबाबदारी मागच्या वर्षी सोडली. २०२१ मध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेल्या टी-२० विश्वकरंडकानंतर विराट कोहलीने टी-२० मधील भारतीय संघाची पण जबादारी सोडली. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाची धुरा आक्रमक फलंदाज रोहित शर्माकडे सोपविण्यात आली. रोहित शर्मा आता भारतीय संघाची धुरा कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्ही प्रकारात संभाळणार आहे.

विराट कोहली हा जेव्हा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता, तेव्हा उपकर्णधाराची धुरा रोहित शर्माकडे होती. आता रोहित शर्माचं भारतीय संघाचा कर्णधार झाल्याने उपकर्णधार कोण होणार असा प्रश्न भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर उभा राहिला होता. मात्र आता त्या प्रश्नाचे उत्तर समस्त क्रिकेट प्रेमींना मिळाले आहे. भारतीय टी-२० क्रिकेट संघाला आता जसप्रीत बुमराह याच्या रूपाने नवीन उपकर्णधार मिळाला आहे.

भारतीय संघाच्या उपकर्णधार पदासाठी ऋषभ पंत याचे नाव पण शर्यतीत होते, मात्र भारतीय क्रिकेट संघाला आता जसप्रीत बुमराह हा नवीन उपकर्णधार मिळाला आहे. बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी विराट कोहली आणि रिषभ पंत यांना संघाबाहेर केले आहे. त्यामुळे यावेळी भारताच्या उपकर्णधारपदी जसप्रीत बुमराह या  वेगवान गोलंदाजाची वर्णी लागली आहे.

   महत्वाच्या बातम्या :     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!