मुंबई: भारतीय संघाची श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी घोषणा झाली आहे. ज्यात अधिकृतपणे रोहित शर्माला सगळ्या फॉरमॅट मधील कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आहे. विराट कोहलीने हळूहळू एक एक फॉरमॅटमधील कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितने जबाबदारी सांभाळली आहे. आता श्रीलंका विरुद्ध मालिकेसाठी त्याला कसोटीचेही कर्णधारपद बहाल करण्यात आले आहे.
१ मार्चपासून सुरू होणारी श्रीलंकेविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका पूर्णवेळ कसोटी कर्णधार म्हणून रोहितची पहिली नियुक्ती असेल. गेल्या काही वर्षांपासून तो कसोटी संघाचा महत्त्वाचा सदस्य बनला आहे आणि क्रमवारीतही तो मुख्य खेळाडूंपैकी एक आहे. मात्र चर्चांप्रमाणे रहाणे आणि पुजाराला खराब फॉर्म बघता वगळण्यात आले आहे. चेतन शर्मा म्हणाले “निवड समितीने निर्णय घेण्यापूर्वी खूप विचार केला. आम्ही त्यांच्याशी आधी बोललो. आम्ही त्यांना सांगितले की आम्ही श्रीलंकेसाठी २ कसोटी सामन्यांसाठी त्यांचा विचार करणार नाही. आम्ही त्यांना सांगितले की त्यांच्यासाठी दरवाजे पूर्णपणे खुले आहेत. केवळ २ कसोटी सामन्यांमध्ये निवडकर्त्यांनी इतर क्रिकेटपटूंना संधी देण्याचा निर्णय घेतला.”
रोहित सगळ्या फॉरमॅटमधील कर्णधार जरी झाला असला तरी त्याच्या फिटनेस बाबत अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत. भारतीय क्रिकेट संघासाठी येणारे पुढचे काही महिने अत्यंत महत्वपूर्ण असणार आहेत. ज्या भारतीय संघ २०२३चे विश्वचषक सुद्धा खेळणार आहे. त्यामुळे आता सगळ्या फॉरमॅट मध्ये नेतृत्व सांभाळण्यासाठी हिटमॅनला त्याच्या फिटनेस वर लक्ष्य देणे गरजेचे ठरेल.
महत्वाच्या बातम्या
- MUMBAI | विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या ताफ्यातील वाहनाला पुन्हा अपघात
- रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है ; संजय राऊतांनी विरोधकांना फटकारले
- श्रीलंका विरुद्ध आगमी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
- दिल्लीपुढे झुकणार नाही आणि शरण जाणार नाही- संजय राऊत
- मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्नीचे बंगले रातोरात गायब केले; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

