Share

IND vs Pak World Cup 2022 : मेलबर्नमधील हवामानाची स्थिती, पाऊस पडण्याची शक्यता किती? मोठी अपडेट समोर

Published On: 

IND vs Pak World Cup 2022  नवी दिल्ली : T20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला अवघे काही तास उरले आहेत. दोन्ही संघांचा सुपर 12 मधील हा पहिलाच सामना आहे. T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानविरुद्ध 5-1 असा विजयी विक्रम आहे. गेल्या वर्षी T20 विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये शेवटचा सामना झाला होता, ज्यामध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकात संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. मात्र, या सामन्यावरही पावसाचे संकट आहे.

टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर पावसाचे संकट पसरले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला मेलबर्नमध्ये जोरदार पाऊस झाला. बुधवारी आणि गुरुवारीही पाऊस सुरूच (Weather Report) होता. स्थानिक हवामान खात्यानुसार, भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या दिवशी पावसाचा अंदाज आहे.

या ‘ब्लॉकबस्टर’ सामन्यापूर्वी हे दोघे गेल्या महिन्यात आशिया चषकात आमनेसामने आले होते. भारताने गट टप्प्यातील सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला, तर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने शानदार पुनरागमन करत सुपर 4 टप्प्यात भारताचा पराभव केला होता.

दोन्ही देशांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

पाकिस्तानी संघ:

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!