मुंबई : विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या ताफ्यातील वाहनाला पुन्हा एकदा अपघात झाला आहे. काल (शुक्रवार) देखील त्यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाला अपघात झाला होता. दरम्यान या अपघातांच्या मालिकेमागे घातपाताचा संशय आरोप भाजप आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.
दोन दिवसांपूर्वी दरेकर त्यांच्या ताफ्यातील वाहनांचा पुणे-बंगळुर महामार्गावरील परगाव-खंडाळा येथे अपघात झाला होता.