Share

श्रीलंका विरुद्ध आगमी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारतीय संघाची श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी घोषणा झाली आहे. ज्यात अधिकृतपणे रोहित शर्माला सगळ्या फॉरमॅट मधील कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच अनेक दिवसांपासून चर्चा असल्याप्रमाणे अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना संघात जागा मिळाली नाही.

विराट कोहली, ऋषभ पंत यांना टी२० सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे तर शार्दुल ठाकूरला संपूर्ण मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले आहेत.भारताचा नुकताच दक्षिण आफ्रिकेचा दौरा चुकवलेल्या रवींद्र जडेजा संघात परत आला आहे. पंतच्या अनुपस्थितीत, संजू सॅमसन टी २०मध्ये संघात असणार आहे. उत्तर प्रदेशचा डावखुरा फिरकीपटू सौरभ कुमार यालाही डोमेस्टिकमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर कसोटी संघात प्रथमच स्थान मिळाले आहे.

T20 संघ: रोहित शर्मा, रुतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश, हुडा, बुमराह (वीसी), भुवी, चहर, हर्षल, सिराज, संजू सॅमसन (विकेटकीपर), जडेजा, चहल, रवी बिश्नोई, कुलदीप, आवेश खान

कसोटी संघ: मयंक, प्रियांक पांचाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन, ऋषभ, केएस भरत, आर अश्विन , रवींद्र जडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जस्सी बुमराह (वीसी), मोहम्मद शमी,मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!