🕒 1 min read
मुंबई: शिवसेना आणि राणे कुटुंबीय यांच्यातील राजकीय वाद सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. शिवसेना पक्ष आणि राणे परिवार यांच्यातील वाद पूर्ण महाराष्ट्राला परिचतच आहे. नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष सोडल्यावर हा वाद रोजच होत आहे. मध्यंतरी किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यावर , शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे.
मंगळवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबईमधील शिवसेना भवन येथे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि गुंडागर्दीचे आरोप केले. काल भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे परिवारावर टीकेची झोड उठवली. तर आज शिवसेना भवन येथे लोकसभा खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे आणि किरीट सोमय्या यांच्यावर पत्रकार परिषदेत टीका केली.
विनायक राऊत भाजप नेत्यांवर टीका करत असतानाच आज तिथे संजय राऊत सुद्धा उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी ईडीच्या चौकश्यांवरून भाजपवर (bjp) पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला. तुम्हाला आमच्या मागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स काय लावायचं ते लावा. आम्ही उत्तर द्यायला एकदम सक्षम आहोत. आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. तुम्ही आम्हाला कितीही धमक्या द्या ;मात्र मी आणि आम्ही सर्व शिवसैनिक त्या धमक्यांना आजिबात घाबरणार नाही. तुम्ही अशा कितीही धमक्या दिल्या तरी ”रिश्ते में हम आप के बाप लगते है आणि बाप काय असतो हे तुम्हाला दिसेल असे प्रत्युत्तर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या :
- दिल्लीपुढे झुकणार नाही आणि शरण जाणार नाही- संजय राऊत
- मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्नीचे बंगले रातोरात गायब केले; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
- ‘तर’ आम्ही सुद्धा राज्याच्या गृहमंत्र्यांकडे राणेंच्या गुन्ह्यांच्या तपासाची मागणी करणार :- विनायक राऊत
- रणजी ट्रॉफी: श्रीलंका दौऱ्याआधी हनुमा विहारीची शतकी खेळी
- “शिवजयंती तिथीने साजरी का करावी?”, राज ठाकरेंनी सांगितले यामागचे कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
