🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये नव्या युगाला सुरुवात झाल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्राला संबोधित केलं.
हा ऐतिहासिक निर्णय असल्याचं सांगत जम्मू-काश्मीरच्या विकासाच्या मार्गातला अडथळा दूर झाल्याचं ते म्हणाले. जम्मू-काश्मीरमध्ये सर्वोत्तम पर्यटन स्थळ बनण्याची क्षमता आहे. चित्रपट सृष्टीनं तसंच अन्य कंपन्यांनी काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करावा, तंत्रज्ञानामुळे काश्मिरी जनतेचं जीवन अधिक सुसह्य होईल, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. काश्मीरमधली परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर पुन्हा जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
नव्या व्यवस्थेत पोलिसांसह राज्याच्या सर्व कर्मचाऱ्यांना अन्य राज्यांसारख्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल, त्याचबरोबर काश्मीर आणि लडाखमधली सर्व रिक्तपदं भरण्याची प्रक्रिया तत्काळ सुरु केली जाईल, यामुळे युवकांना रोजगार मिळेल, असं ते म्हणाले.
कोल्हापूर-सांगलीत महापुर,नांदेड शहरात तीव्र पाणी टंचाई
भाजप मंत्र्यांनी लाज सोडली ?, महापुराची पाहणी करणाऱ्या महाजनांची हसत सेल्फीसाठी पोझ
देशाला सुवर्ण दिवस स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या त्यागामुळेच : अरविंद सावंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
