Share

भाजप मंत्र्यांनी लाज सोडली ?, महापुराची पाहणी करणाऱ्या महाजनांची हसत सेल्फीसाठी पोझ

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, यामध्येच सांगलीतील ब्राम्हणाळ येथे बोट उलटून 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोल्हापूर सांगलीतील चित्र सामान्य नागरिकांचे ह्रदय पिळवटून टाकत आहे, दुसरीकडे मात्र राज्यातीक सत्ताधारी मंत्र्यांची माणुसकी आटली की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केल्यानंतर आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे पुराची पाहणी करत आहेत. महाजन हे बोटीत स्वार होऊन कोल्हापूर सांगलीच्या भागामध्ये फिरत आहेत, यावेळी महाजन यांच्या समवेत बोटीमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने सेल्फीसाठी मोबाईल उंचावला, तर महाजन हे हसत सेल्फी देत होते. गिरीश महाजन यांच्या सेल्फीचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्यामुळे राज्यातील मंत्री किती असंवेदनशील बनले आहेत, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, सामान्य नागरिक पुराच्या पाण्यामध्ये अडकलेला असताना गिरीश महाजन यांची बॉडी लँग्वेज चुकीची असून, मुख्यमंत्र्यांनी गंभीर मंत्र्याला पाठवलं असतं, तर बरं झालं असतं, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

पुणेकरांना आली अजित दादांची आठवण, बापटांना टोमणा मारत अजित पवारांचे गुणगान

मुख्यमंत्र्यांचा विश्वास फक्त महाजन आणि चंद्रकांत पाटलांवरच : पृथ्वीराज चव्हाण

महाजन हे महान नेते ! संजय राऊतांचा उपरोधिक टोला

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!