🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: सांगली शहरात महापुराची परिस्थिती कायम असून शहरातल्या बाजारपेठेत पाणी शिरलं आहे. बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची आणखी तीन पथकं तर राज्य आपत्ती निवारण दलाची दोन पथकं तैनात करण्यात आली आहेत. आज काही भागांमधे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचाव कार्य हाती घेतलं जाणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातल्या एक लाख वीस हजार लोकांना तसंच २५ हजारावर जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
नांदेड जिल्ह्यात हदगाव, हिमायतनगर, माहूर आणि किनवट या भागात गेल्या पंधरा दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पिकं पिवळी पडत आहेत. दुसरीकडे नांदेड शहराची जीवन वाहिनी असलेल्या गोदावरी नदी पात्रात अद्यापही अपेक्षित पाणी नाही. नांदेड शहरात तीव्र पाणी टंचाई असून अनेक भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातल्या जायकवाडी धरणात सध्या अहमदनगर तसंच नाशिक जिल्ह्यातून बासष्ट हजार पासष्ट घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. धरणाचा पाणी साठा सुमारे सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
भाजप मंत्र्यांनी लाज सोडली ?, महापुराची पाहणी करणाऱ्या महाजनांची हसत सेल्फीसाठी पोझ
चिंता करू नका, शासन नुकसान भरपाई देणार ; मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्तांना दिलासा
पूरग्रस्तांना मदतीची गरज, विमानातून घिरट्या घालून काही होणार नाही – आंबेडकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
