Share

देशाला सुवर्ण दिवस स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या त्यागामुळेच : अरविंद सावंत

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : ‘छोडोभारत’, ‘गोवा मुक्तीसंग्राम’ आणि ‘हेद्राबाद मुक्ती संग्रामात’ जिवाची बाजी लावून ब्रिटीश सत्ते विरोधात बंड पुकारणाऱ्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या त्यागामुळेच भारतदेशाला सुवर्ण दिवस प्राप्त झाले, असे गौरवोद्गगार केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अरविंद सावंत यांनी गुरुवारी काढले.

क्रांतीदिनी महाराष्ट्रातीलस्वातंत्र्य  संग्राम  सैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री सावंत यांनी महाराष्ट्र सदनात या स्वातंत्र्यसैनिकांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा सत्कार केला. त्यांच्यासोबत अनौपचारीक गप्पाही मारल्या. यावेळी सावंत यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. ‘छोडोभारत’, ‘गोवा मुक्तीसंग्राम’ आणि ‘हैद्राबाद मुक्ती संग्रामात’ स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या दिलेल्या योगदानाबाबत त्यांच्याच शब्दात जाणून घेतले. मुंबई दक्षिण –मध्य लोकसभा मतदार संघाचे खासदार राहुल शेवाळे, अचलपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बच्चू कडू, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यावेळी उपस्थित होते.

भारत देश पारतंत्र्यात असताना ब्रिटीश सत्ते विरोधात बंड पुकारणाऱ्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या त्यागाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याच्या भावना सावंत यांनी व्यक्त केल्या. जीवाची बाजी लावून ब्रिटीशांविरोधात बंड पुकारणाऱ्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या त्यागामुळेच भारतदेशाला सुवर्ण दिवस प्राप्त झाले असेही सावंत म्हणाले. यावेळी महाराष्ट्र सदनाच्या लॉबीमध्ये स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा आशिर्वाद घेतल्यानंतर सावंत यांनी ‘भारत माता की जय’ असा जय घोष दिला त्यामुळे देशभक्तीमय वातावरण झाले.

यावेळी भंडारा जिल्ह्यातील भिवाजी अंबुले, नागपूर जिल्ह्यातील रतनचंद जैन, परभणी जिल्ह्यातील माधवराव कुलकर्णी, औरंगाबाद जिल्ह्यातील लक्ष्मण उखडे, लातूर जिल्ह्यातील शिवलींगप्पा इराप्पा उर्फ विरभद्रप्पा सिद्रामप्पा मंडगे, वर्धा जिल्ह्यातील गणेश बाजपेयी आणि बीड जिल्ह्यातील बन्सी जाधव या स्वातंत्र संग्राम सैनिकांचा सत्कार सावंत यांनी केला.

सोन्याने आजवरचे सर्व रेकॉर्ड तोडले, 38,500 रुपये तोळ्याचा टप्पा ओलांडला

 

या’ कारणासाठी शिवसेनेनी केले पाकडय़ांचे त्रिवार अभिनंदन

 

पूरग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या – शरद पवार

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!