🕒 1 min read
Sudhir Mungantiwar | मुंबई : सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी जगदंबा तलवार महाराष्ट्रात परत यावी यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही पाठपुरावा करत आहोत. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून जगदंब तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. अशातच त्यांनी आता अजून एक घोषणा केली आहे.
“ब्रिटनमध्ये असलेली जगदंबा तलवार परत यावी. ज्या दगाबाज अफजलखानाने पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपला महाराष्ट्रीय बाणा दाखवला आणि त्याचे पोट ज्या वाघनखांनी फाडले ती वाघनखंदेखील ब्रिटनमध्ये आहेत. ते शिवराज्याभिषेक दिनापर्यंत महाराष्ट्रात यावीत असा आमचा प्रयत्न आहे,” अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
पुढे ते म्हणाले, “जगदंबा तलवार भारतात आणण्यासाठीही आपण प्रयत्न करत आहोत. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना यामध्ये विशेष लक्ष द्यावे अशी विनंती केली आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नांना किती यश मिळेल हे मी आताच सांगू शकत नाही. मात्र प्रयत्न करण्यास हरकत नाही.”
साधारणपणे 1875 ते 1876 च्या दरम्यान ही तलवार महाराष्ट्रातून ब्रिटनला गेली. त्यावेळचे प्रिन्स भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांना काही भेटवस्तू देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये जगदंबा तलवारीची समावेश होता. शिवरायांच्या पराक्रमाची साक्षीदार असलेली ही जगदंबा तलवार आणि वाघनखं जर महाराष्ट्रात परत आली तर ती सर्वांसाठी आनंदाची गोष्ट असणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | स्वतः एकनाथ शिंदेच म्हणाले, “राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस”
- IND vs BAN | खराब फॉर्ममुळे ‘हे’ खेळाडू होऊ शकतात प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर
- Akkalkot | “…अन्यथा कर्नाटकात जाणार” ; अक्कलकोटमधील 11 गावांचा ठराव! ग्रामस्थांचा सरकारला इशारा
- Malaika Arora | “हे माझ्यासाठी कधीच सोप नव्हतं…” ; अर्जुनसोबतच्या नात्याबद्दल मलायकाचे स्पष्टीकरण
- Sushma Andhare | “पंतप्रधान मोदींची मुलाखत अक्षय कुमार घेतात, मग पत्रकार काय….”; सुषमा अंधारेंचा परखड सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
