🕒 1 min read
Sudhir Mungatiwar | मुंबई : कर्नाटकातील बेळगाव येथील बागेवाडी येथे मंगळवारी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक केली. यावरुन महाराष्ट्रात वातावरण तापलं आहे. यानंतर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनंगटीवार (Sudhir Mungatiwar) यांनी थेट कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.
जर कोणी गुंडाने महाराष्ट्राशी गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हे कर्नाटकने लक्षात ठेवावे आणि आणि अशा लोकांना आम्ही नक्कीच धडा शिकवू शकतो, असा इशारा मुनगंटीवार यांनी दिला आहे.
तसेच, महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात हल्ला करण्यात आल्यानंतर कर्नाटक सरकारने अशा गुंडांवर ताबडतोब कारवाई करावी आणि जे जाळपोळ करतात, त्यांना तुरुंगात टाकावे, असं देखील मुनगंटीवार म्हणाले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेचे प्रश्न तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जन्माला घातले, प्रांत निर्मितीसाठी आयोग स्थापन झाला तेव्हा पंडित नेहरूंनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या आवाजाचा आदर केला नाही आणि त्याचे परिणाम आज महाराष्ट्रातील जनता, मराठी जनता भोगत आहे, अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Rohit Patil | “कन्नड गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध, सत्तारुढ पक्षांनी…” ; रोहित पाटील आक्रमक!
- Devendra Fadanvis | कर्नाटकात महाराष्ट्राच्या वाहनांवर झालेल्या दगडफेकीनंतर देवेंद्र फडणवीसांचा बोम्मईंना फोन
- Sanjay Raut | “महाराष्ट्र पेटला तर…” ; कर्नाटक वादावरुन संजय राऊत यांची शिंदे सरकारवर जहरी टीका
- Sharad Pawar | महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक झाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “उद्यापासून…”
- Eknath Shinde | सर्वसामान्य व्यक्ती सत्तेच्या सर्वोच्च स्थानी बसली हे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच – एकनाथ शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
