Share

Amol Mitkari | भाजपवाल्यांनी शिवरायांच्या अपमानाची सुपारी घेतली ; अमोल मिटकरी यांचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

Amol Mitkari |  मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची विधाने नवे राजकीय भूकंप घडवून आणण्याचे काम करत आहेत. कोश्यारींच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होत असून तरी भाजपच्या अडचणीत वाढ होत आहे. प्रत्येक वादग्रस्त विधान भाजपकडून स्पष्टीकरणाची मागणी होत आहे. या स्थितीत पक्ष मध्येच अडकला आहे. भाजप या नेत्यांचा उघडपणे विरोध करू शकत नाही किंवा उघडपणे समर्थन करू शकत नाही. यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी आणखी भर टाकली दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) ऐकेरी उल्लेख केला आहे. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी टीका केली आहे.

अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले, “भाजपच्या नेत्यांनी शेण खाण्याची परंपरा कायम ठेवली. आत्ता परत एकदा भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी शेण खाल्ले. छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख केला. भाजपवाल्यांनी शिवरायांच्या अपमानाची सुपारी घेतली, याचा आणखी एक पुरावा. दानवेंवर कारवाई करा.”

यापूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari), भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, मंगल प्रभात लोढा, संजय गायकवाड, यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. त्यांच्यावर अजून कारवाई झाली नाही. तर रावसाहेब दानवेंचे नवीन विधान समोर आले आहे. त्यामुळे भाजपची चांगलीच अडचण झाली आहे.

रावसाहेब दानवे यांचे स्पष्टीकरण –

“मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकेरी भाषेचा उल्लेख केल्याचं वृत्त दाखवण्यात आलं. दोन वर्षापूर्वी नाशिक दौऱ्यांवर असताना तिथल्या पत्रकारांनी मला राज्यपालांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया विचारली होती. त्यावेळी अनावधानाने माझ्याकडून अशा प्रकारे एकेरी उल्लेख केला गेला. त्या काळात माझ्याविरोधात टीकेची झोड उठली होती. त्यावेळी मी देशवासियांची माफी देखील मागितली होती. मी आज अशा प्रकारचे वक्तव्य केले नाही तरी देखील पून्हा एकदा सर्व जनतेची माफी मागतो”, असं स्पष्टीकरण रावसाहेब दानवे यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!