बारामती : पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे १० मार्चनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल. १० मार्चनंतर महाविकास आघाडी सरकारला सत्ता सोडावी लागेल. कारण ठाकरे सरकारमधील मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी केले होते. दरम्यान, पाटलांच्या या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी उपहासात्मक शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना अजित पवार म्हणाले की,‘चंद्रकांत पाटील ही फार मोठी व्यक्ती आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने बोलणे योग्य होणार नाही’, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, पाटलांच्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून चंद्रकांत पाटील यांना फ्रस्ट्रेशन आले आहे. आता १० मार्च नंतर पाच राज्यांच्या निवडणुका येतील मग ते सरकार पडेल. या अगोदर पश्चिम बंगालच्या निवडणुका होत्या. मात्र काही झाले नाही. त्यांचे प्रयत्न त्यांनी विविध माध्यमातून सुरु ठेवावे. ईडी , सीबीआय अशा माध्यमांतून त्यांनी आपले प्रयत्न सुरु ठेवावेत, असे राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- IPL AUCTION 2022: काही जुने तर काही नवे ‘whistle podu’ करण्यास धोनीची चेन्नई तय्यार
- “तऱ्हेवाईक नाना पटोलेंनी सागर बंगल्या जवळ येऊन दाखवावे”, प्रसाद लाड यांचे आव्हान
- “हा जाती भेद नाही का?”, ‘त्या’ जाहिरातीवरून जितेंद्र आव्हाड आक्रमक
- “महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे नाते आई आणि मावशीचे पण मोदींनी..”, नाना पटोलेंचा टोला
- “वाईनबाबत भाजपची दुटप्पी भूमिका का?”, एकनाथ खडसेंचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

