🕒 1 min read
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत भाषण करताना कॉंग्रेसवर निशाणा साधला होता. देशात कोरोना संक्रमणाला कॉंग्रेस जबाबदार असल्याचा आरोप मोदींनी केला होता. यावरच राज्यातील कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा घेतमागील काही दिवसांपासून राज्यभरात भाजप कार्यकर्ते आणि भाजप नेत्यांच्या घरावर आंदोलन छेडले आहे. दरम्यान कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर यावरच भाजप आमदार प्रसाद लाड (BJP MLA Prasad Lad) यांनीही नाना पटोले यांना प्रतिआव्हान दिले आहे.
“नाना, तुझ्या आव्हानाला प्रतिआव्हान देतोय. तू उद्या सकाळी 10 वाजता येऊनच दाखव, नाही तुला उलटा प्रसाद दिला तर आम्ही पण भाजप कार्यकर्ते नाही. सागरवर तू ये, पाहतो तू कसा परत जातो ते”, अशा शब्दात प्रसाद लाड यांनी नाना पटोलेंना आव्हान दिलं आहे.
अती बोलघेवडेपणा बरा नाही नाना पटोले!
तऱ्हेवाईक नाना पटोलेंनी सागर बंगल्याच्या जवळ तरी येऊन दाखवावे!
मग बघूया!
ते आहेत आणि भाजपचे कार्यकर्ते आहे.
आता जशास तसे उत्तर मिळेल!– आमदार प्रसाद लाड pic.twitter.com/QpuItb7bKm
— Prasad Lad (@PrasadLadInd) February 13, 2022
“अती बोलघेवडेपणा बरा नाही नाना पटोले. तऱ्हेवाईक नाना पटोलेंनी सागर बंगल्याच्या जवळ तरी येऊन दाखवावे, मग बघूया. ते आहेत आणि भाजपचे कार्यकर्ते आहे. आता जशास तसे उत्तर मिळेल!”, असेही प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL AUCTION 2022: काही जुने तर काही नवे ‘whistle podu’ करण्यास धोनीची चेन्नई तय्यार
- “वाईनबाबत भाजपची दुटप्पी भूमिका का?”, एकनाथ खडसेंचा सवाल
- Valentine’s Day : “प्रिय राजीवजी, मी कायम…”, पतीच्या आठवणींत डॉ. प्रज्ञा सातव यांची भावूक पोस्ट
- IPL AUCTION 2022: आयपीएल मेगा ऑक्शनची समाप्ती; ‘हे’ मोठे नाव राहिले ‘अनसोल्ड’
- “सरकार गेल्यापासून फडणवीस फ्रस्ट्रेशनमध्ये, विरोधी पक्षाच्या वागण्यात…’, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
