बंगळूरू: आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये धोनीच्या चेन्नईने यावेळी काही मोठे निर्णय घेतले आहे. आधी केवळ ४ खेळाडू रिटेन करत त्यांनी बाकी सगळ्या खेळाडूंना ऑक्शन मध्ये पाठवले. ज्यात काही खेळाडूंना त्यांनी पुन्हा संघात घेतले तर काही मोठ्या बोलीनंतरही संघात येऊ शकले नाहीत. स्पर्धेच्या सुरुवातीपासून चेन्नईचा ‘चिन्ना थाला’ असलेला सुरेश रैनालाही डाक्कादायक रित्या त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
IPL 2022 च्या ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्सने २१ खेळाडूंना खरेदी केले आहे . यात ड्वेन ब्राव्हो, अंबाती रायुडू, रॉबिन उथप्पा, दीपक चहर, मिचेल सँटनर आणि शिवम दुबे CSK ने विकत घेतलेलय काही लोकप्रिय खेळाडू आहेत. चेन्नईने पहिल्यांदाच एका खेळाडूसाठी दिलखुलास बोली लावली आहे. दीपक चहरला १४ कोटींमध्ये खरेदी केले आहे. चेन्नई सुपर किंग्सकडे ९० कोटींपैकी ४२ कोटी रुपये शिल्लक होते. चार वेळा आयपीएल चॅम्पियन असलेल्या चेन्नईने रवींद्र जडेजाला रु. १६ कोटी, एमएस धोनी रु. १२ कोटी, मोईन अली रु. ८ कोटी आणि रुतुराज गायकवाड यांना रु. ६ कोटीमध्ये खरेदी केले होते.
आयपीएल मेगा ऑक्शननंतर चेन्नई सुपर किंग्सचा संघ पुढील प्रमाणे आहे. : रवींद्र जडेजा, एमएस धोनी, मोईन अली, रुतुराज गायकवाड, ड्वेन ब्राव्हो, अंबाती रायुडू, रॉबिन उथप्पा, दीपक चहर, केएम आसिफ, तुषार देशपांडे, केएम आसिफ, शिवम दुबे, महेश थेक्षाना, राजवर्धन हंगरगेकर, समरजीत सिंग, प्रेव्होनेसिंग, देवोनेसिंग , मिचेल सँटनर, शुभ्रांशू सेनापती, अॅडम मिलने, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सी हरी निशांत, एन जगदीसन, ख्रिस जॉर्डन, के भगत वर्मा.
महत्वाच्या बातम्या
- Valentine’s Day : “प्रिय राजीवजी, मी कायम…”, पतीच्या आठवणींत डॉ. प्रज्ञा सातव यांची भावूक पोस्ट
- IPL AUCTION 2022: आयपीएल मेगा ऑक्शनची समाप्ती; ‘हे’ मोठे नाव राहिले ‘अनसोल्ड’
- “सरकार गेल्यापासून फडणवीस फ्रस्ट्रेशनमध्ये, विरोधी पक्षाच्या वागण्यात…’, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
- बजाज यांच्या निधनाने उद्योग जगतानेच नव्हे तर देशाने एक बेडर आवाज गमावला- संजय राऊत
- एबीजी शिपयार्ड लि. घोटाळ्यावरून राहुल गांधींची नरेंद्र मोदी यांच्यावर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

