Share

“महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे नाते आई आणि मावशीचे पण मोदींनी..”, नाना पटोलेंचा टोला

Published On: 

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संसदेतील वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे. देशात कोरोना संक्रमणाला कॉंग्रेस आणि महाराष्ट्र शासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावरच राज्यातील कॉंग्रेस पक्ष आक्रमक झाला असून भाजप नेत्यांच्या घरावर आंदोलन छेडले आहे. तर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी आता पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis)यांच्या सागर बंगल्यावर आंदोलनाचा इशारा दिला आहे. आता पुन्हा एकदा नाना पटोलेंनी ट्वीट करत मोदींना निशाण्यावर धरले आहे.

“आज उत्तर प्रदेशातील जनता मतदान करणार आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील नाते आई आणि मावशीचे आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचा या नात्याचा अपमान केला आहे. हा अपमान लक्षात ठेवा. जय महाराष्ट्र, जय उत्तर प्रदेश.”, असे ट्वीट करत त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे.

https://twitter.com/NANA_PATOLE/status/1493081092336730112

दरम्यान नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड (BJP MLA Prasad Lad) यांनीही प्रतिआव्हान दिले आहे. “नाना, तुझ्या आव्हानाला प्रतिआव्हान देतोय. तू उद्या सकाळी 10 वाजता येऊनच दाखव, नाही तुला उलटा प्रसाद दिला तर आम्ही पण भाजप कार्यकर्ते नाही. सागरवर तू ये, पाहतो तू कसा परत जातो ते”, अशा शब्दात प्रसाद लाड यांनी नाना पटोलेंना आव्हान दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!