भुसावळ : राज्यात वाईन विक्रीच्या (Wine Sale) निर्णयावरून भाजप नेते आक्रमक झाले आहेत. तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी देखील हा निर्णय मागे घेण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. हा निर्णय मागे घेतला गेला नाही तर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देखील अण्णा हजारे यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर बोलत असतांना काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच वाईनबाबत भाजपची दुटप्पी भूमिका का?, असा सवालही खडसेंनी केला आहे.
यासंदर्भात एका कार्यक्रमात बोलत असतांना एकनाथ खडसे म्हणाले की,‘भाजप सरकारने मध्यप्रदेशमध्ये मॉलमध्ये बियर विकायला परवानगी दिली असून आंध्र प्रदेशमध्ये भाजपला निवडून दिल्यास दारूही गरिबांच्या हिताची असल्याने पन्नास रुपयांमध्ये दारू देऊ असे वक्तव्य येथील प्रदेशाध्यक्षांनी केले आहे. त्यामुळे वाईनबाबत भाजपची दुटप्पी भूमिका का?’, असा सवालही खडसेंनी विचारला आहे.
दरम्यान, वाईन ही आपली संस्कृती नाही. आपल्या राज्यात दारुची दुकानं कमी आहेत का? तरी तुम्ही किराणा आणि सुपरमार्केटमध्ये वाईन ठेवत आहात. तुम्हाला तरुण पिढीला व्यसनाच्या आहारी लावायचे आहे का? तुमच्या या निर्णयाने मी दु:खी झालो आहे. त्यामुळे मला तुमच्या राज्यात जगायची इच्छा राहिली नाही, असे वक्तव्य अन्ना हजारे यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- बजाज यांच्या निधनाने उद्योग जगतानेच नव्हे तर देशाने एक बेडर आवाज गमावला- संजय राऊत
- “सरकार गेल्यापासून फडणवीस फ्रस्ट्रेशनमध्ये, विरोधी पक्षाच्या वागण्यात…’, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
- IPL AUCTION 2022: आयपीएल मेगा ऑक्शनची समाप्ती; ‘हे’ मोठे नाव राहिले ‘अनसोल्ड’
- Valentine’s Day : “प्रिय राजीवजी, मी कायम…”, पतीच्या आठवणींत डॉ. प्रज्ञा सातव यांची भावूक पोस्ट
- काँग्रेसचा पंजाबसाठीच्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस; मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी केली घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

