🕒 1 min read
सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून उजनी धरणाच्या मुद्द्यावर सोलापुरातील राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. उजनीच्या पाणी वाटपावरून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद विवाद होताना दिसून येत आहे. सोलापूरकरांचा विरोध डावलून उजनीचं पाणी बारामती आणि इंदापूर तालुक्याला नेण्याचा घाट घातल्याचा आरोप काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर अप्रत्यक्षपणे केला आहे .
आता उजनीच्या पाणी प्रश्नावरून सोलापुराचे पालकमंत्री बदलणार अशा चर्चांना उधाण आले होते, यावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. “पालकमंत्री बदलण म्हणजे काय बाजाराचा भाजीपाला असतो का ?” असा प्रतिप्रश्नच सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी पत्रकारांना विचारलाय. यामुळे पालकमंत्र्यांच्या या बेधडक प्रतिक्रियेची पक्षीय पातळीवर कशी दखल घेतली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
दरम्यान, लाकडी – निंबोडी ही इंदापूर – बारामतीसाठीची योजना जुनीच आहे, त्यामुळे पाणी पळवण्याचा प्रश्नच उदभवत नाही आणि येणाऱ्या काळात सोलापूरकरांच्या पाणी प्रश्नासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे भरणे यांनी सांगितलं आहे. सोलापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी भरणे आले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
