Share

IRE vs IND : आर्यलंडवर क्लीन स्वीप..! भारताचा कॅप्टन हार्दिक पंड्या म्हणतो, ‘‘मला माझ्यावर…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने आयर्लंडविरुद्धच्या (IRE vs IND) दुसऱ्या टी-२० सामन्यात चार धावांनी विजय नोंदवला. या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या मालिकेमध्ये यजमानांचा क्लीन स्वीप केला आहे. या मालिकेसाठी हार्दिक पंड्याकडे भारताचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. दुसरा टी-२० हा मोठा धावसंख्येचा सामना होता आणि भारतीय संघ खूप दडपणाखाली होता. हा सामना जिंकल्यानंतर हार्दिकने आपली प्रतिक्रिया दिली.

हार्दिक म्हणाला, ”मला माझ्यावर दबाव आणायचा नव्हता. मला वर्तमानात राहायचे होते आणि मी उमरानला पाठिंबा दिला. त्याच्याकडे वेग आहे आणि त्याच्या वेगाच्या विरोधात १८ धावा करणे नेहमीच कठीण होते. त्यांनी काही अप्रतिम फटके मारले आणि त्यांची फलंदाजी उत्कृष्ट होती. श्रेय आयर्लंडला द्यायला हवे आणि आमच्या गोलंदाजांनाही नियंत्रण ठेवण्याचे श्रेय दिले पाहिजे.”

आयर्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या या मालिकेत भारतीय संघाला मोठा पाठिंबा मिळाला. मैदानातील बहुतांश प्रेक्षक भारतीय संघाला पाठिंबा देत होते आणि विशेषतः संजू सॅमसनच्या चाहत्यांची संख्या खूप जास्त होती. हार्दिकने चाहत्यांचे समर्थन केल्याबद्दल आभार मानले आहेत. ”संजू आणि दिनेश लोकांचे आवडते होते. जगाचा हा कोपरा अनुभवणे खूप छान होते. आम्हाला खूप पाठिंबा मिळाला आणि आम्ही त्यांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार. लहानपणी भारताकडून खेळणे हे नेहमीच स्वप्न असते. त्याच्या नेतृत्वाखाली संघाला मालिका विजयापर्यंत नेण्याचा अनुभव उत्तम आहे. दीपक आणि उमरानसाठी मी खूप आनंदी आहे”, असे हार्दिकने सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!