Share

Eknath Shinde : आसाम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी बंडखोर आमदार देणार ५१ लाख रुपयांची मदत

Published On: 

🕒 1 min read

गुवाहाटी: आसाम मधील पूर परिस्थिती आता काही प्रमाणात नियंत्रणात आली आहे. मात्र अजूनही लाखो नागरिक या पुरामध्ये अडकलेले आहेत. आसाम मधील पोलीस स्टेशनची इमारत देखील मोडून पडली आहे. यासंदर्भात अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांचा शोध ड्रोनच्या साह्याने घेतला जात आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत.

या पार्श्वभूमीवर आसाम मधील पूरग्रस्त पूरग्रस्तांसाठी शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार आसाम मुख्यमंत्री मदत निधीत ५१ लाख रुपये देणार असल्याची माहिती आमदार एकनाथ शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. सोशल मीडियावर या ट्विट ची जोरदार चर्चा होत असून या ट्विटला अनेक कमेंट्स येत आहेत. ‘शिवसेना महाराष्ट्र वुईथ आसाम’ असा हॅशटॅग वापरत एकनाथ शिंदे यांनी हे ट्विट केलं आहे.

“आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत ५१ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय.” अशा आशयाचं ट्विट बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे पत्र पाठवले आहे राज्यपालांनी उद्याच बहुमत सिद्ध करायला देखील सांगितला आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी उद्याच्या बहुमत चाचणीत सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र बहुमत चाचणीत सहभागी होण्यासाठी मुंबईत येणाऱ्या बंडखोर आमदार यांचा मुक्काम नेमका कुठे असणार याबाबत बोलण्याला त्यांनी नकार दिला आहे. शिवसेनेतून ४० पेक्षा अधिक आमदार हे शिंदे गटात सहभागी झाल्याने ही बहुमत चाचणी महाविकास आघाडीसाठी अग्निपरीक्षा ठरणार असल्याच चित्र दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!