मुंबई : भारताने आयर्लंडविरुद्धच्या २ सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० असा क्लीन स्वीप दिला आहे. मात्र, या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विजय भारताच्या हातातून निसटताना होता. शेवटच्या षटकात उमरान मलिकने चांगली गोलंदाजी केली नसती तर दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पहावं लागलं असतं. या शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ७ गडी गमावून २२५ धावा केल्या आणि आयर्लंडसमोर २२६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण एका क्षणी ही धावसंख्या आयर्लंडच्या फलंदाजांसमोर कमी वाटत होती. संघाला सामना गमवावा लागणार असे वाटत असताना, उमरान मलिकने शेवटच्या षटकात १७ धावांचा बचाव करत संघाला सामना आणि मालिका दोन्ही जिंकून दिले.
शेवटच्या षटकाचा थरार
२२६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडला शेवटच्या षटकात १७ धावांची गरज होती. भारताचा कर्णधार हार्दिक पंड्याने युवा उमरान मलिककडे चेंडू सोपवला. उमरान या सामन्यात ३ षटकात ३० धावा देत महागडा ठरला होता. पण उमरानने आपल्या कर्णधाराला निराश होऊ दिले नाही. उमरानचा पहिला चेंडूवर एकही धाव निघाली नाही. पण दुसऱ्या चेंडूवर त्याने नो बॉल टाकल्यावर दबाव स्पष्टपणे दिसत होता. पुढच्या दोन चेंडूंवर आयर्लंडचा फलंदाज मार्क एडरने चौकार मारून संघासह चाहत्यांची धाकधूक आणखी तीव्र केली. पण नंतर उमरानने पुनरागमन केले आणि पुढच्या तीन चेंडूंवर फक्त एकेरी तीन धावा दिल्या. यासह उमरानने भारताला सामना आणि मालिका जिंकण्यात मोलाची मदत केली.
????. ????. ????. ????. ????. ????. ???? ????
That's a wrap from Ireland! ????#TeamIndia win the two-match #IREvIND T20I series 2️⃣-0️⃣. ???? ???? pic.twitter.com/7kdjMHkrFR
— BCCI (@BCCI) June 28, 2022
उमरान दोन सामन्यात झिरोतून हिरो ठरला
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळण्याच्या संधीची वाट पाहणाऱ्या उमरानला आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली. पण या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने षटकांची संख्या कमी करण्यात आली. त्यामुळे १२ षटकांच्या सामन्यात उमरानला फक्त एकच षटक टाकण्याची संधी मिळाली. त्यातही तो महागडा ठरला आणि त्याने १४ धावा खर्च केल्या होत्या.
आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा उमरानला संधी मिळाली आणि अखेरच्या षटकात त्याने १७ धावांचा बचाव करत संघाला विजय मिळवून दिला. या महत्त्वाच्या सामन्याचा उमरान हिरो ठरला. या सामन्यात त्याने पहिला आंतरराष्ट्रीय गडी बाद केला. त्याने आयर्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज लार्कन टकरला बाद करून त्याच्या आंतरराष्ट्रीय बळीचे खाते उघडले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

