Share

Nana Patole : “…अशा पद्धतीचे आदेश राज्यपालांनी का काढावेत?”, नाना पटोलेंचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेत एकनाथ शिंदे गटातील बंडखोरीनंतर महाविकास आघाडी अल्पमतात आली असल्याचा दावा करत यावर राज्यपालांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासंदर्भातील पत्र पाठवले असून सरकारला उद्या (गुरुवारी) बहुमत सिद्ध करायचे आहे. यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केले आहे.

राज्यपालांनी या प्रकरणावर घेतलेली भूमिका खेदजनक आहे. शिवसेनेने आपला गटनेता बदलला आहे. मग उद्या विधानसभेत कुणाचा व्हीप लागू होईल? राज्यपाल विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत वेगळी भूमिका घेतात. मग काल रात्रीतून असं काय घडलं? बहुमत सिद्ध करण्यासाठी ४८ तासांची मुदत देत अशा पद्धतीचे आदेश राज्यपालांनी का काढावेत? हा चमत्कार आहे. असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

दरम्यान शिवसेनेने बहुमताच्या निर्णयाविरोधात थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. सदरील आदेशाच्या विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर आज पाच वाजता सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर आजच सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!