Share

इंग्लंडचा दिग्गज कप्तान मायकेल वॉन BBC कॉमेंट्री पॅनलमधून बाहेर..! वाचा नक्की झालं काय

Published On: 

मुंबई : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन (Michael Vaughan) याने बीबीसी कॉमेंट्री पॅनलमधून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. वर्णद्वेषाच्या आरोपानंतर वॉनने हा निर्णय घेतला आहे. यॉर्कशायरचा खेळाडू अझीम रफिकने मायकेल वॉनवर हे आरोप केले आहेत. वॉनने आरोप नाकारले आहेत आणि बीबीसी समालोचन पॅनेल सोडले आहे.ॉ

रफिक काय म्हणाला?

पाकिस्तानी वंशाचा खेळाडू अझीम रफिक यॉर्कशायरकडून काऊंटी क्रिकेट खेळायचा. रफिकने वॉनवर वर्णद्वेषाचा आरोप करत म्हटले की २००९ मध्ये एका सामन्यापूर्वी वॉनने त्याला आणि इतर दोन आशियाई खेळाडूंना सांगितले होते, ‘तुमच्यासारखे बरेच लोक (आशियाई) आहेत, आम्हाला त्याबद्दल काहीतरी करावे लागेल.’

मायकेल वॉनने सांगितले, ”कॉमेंट्री सोडण्याच्या निर्णयामागील मुख्य कारण म्हणजे माझ्या कुटुंबाची सुरक्षा.” ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेदरम्यान वॉन बीबीसीच्या समालोचन पॅनेलवर नव्हता. यानंतर वॉन न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत परतला. कॉमेंट्री पॅनल सोडण्याच्या निर्णयानंतर वॉन आता भारत-इंग्लंड सामन्यात कॉमेंट्री करणार नाही. हा कसोटी सामना १ जुलैपासून बर्मिंगहॅम येथे खेळवला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!