🕒 1 min read
मुंबई : भारत आणि आयर्लंड (IRE vs IND) यांच्यात डब्लिन येथे मालिकेतील दुसरा टी-२० सामना खेळला गेला. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत भारताने ४ धावांनी विजय मिळवत मालिका २-० अशी जिंकली. या सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर दीपक हुडाचे शतक आणि संजू सॅमसनच्या ७७ धावांच्या खेळीमुळे भारताने आयर्लंडला २२६ धावांचे आव्हान दिले. भारत हा सामना मोठ्या फरकाने जिंकेल, असे वाटत होते. पण आयरिश खेळाडूंनी दमदार झुंज देत भारतीय गोलंदाजांना चांगलेच थकवले. कप्तान अँड्र्यू बालबर्नीचे स्फोटक अर्शतक आणि पॉल स्टर्लिंगच्या वादळी सुरुवातीमुळे आयर्लंडचा संघ २० षटकात ५ बाद २२६ धावांपर्यंच पोहोचू शकला.
आयर्लंडचा डाव
भारताच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर पॉल स्टर्लिंग आणि कप्तान अँड्र्यू बालबर्नी यांनी सहा षटकातच ७२ धावांची सलामी दिली. स्टर्लिंगने १८ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ४० धावा केल्या. रवी बिश्नोईने त्याचा त्रिफळा उडवत ही भागीदारी मोडली. त्यानंतर कप्तान बालबर्नीने किल्ला लढवला. त्याने ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६० धावा केल्या. हर्षल पटेलने त्याला थांबवले. शतकानंतर तो बाद झाला. शेवटच्या पाच षटकात जॉर्ज डॉकरेल आणि मार्क एडेयर यांनी आक्रमक फटके खेळले. डॉकरेलने ३ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ३४ तर एडेयरने ३ चौकार आणि एका षटकारांसह नाबाद २३ धावा केल्या. २० षटकात आयर्लंडला ५ बाद २२१ धावांपर्यंत पोहोचता आले.
What a thriller we've witnessed ????#TeamIndia win the 2nd #IREvIND by 4 runs and seal the 2-match series 2️⃣-0️⃣ ????????
Scorecard ▶️ https://t.co/6Ix0a6evrR pic.twitter.com/6GaXOAaieQ
— BCCI (@BCCI) June 28, 2022
In his second match, Umran Malik delivered for India under pressure.#IREvIND pic.twitter.com/ICCzvnVuH5
— CricTracker (@Cricketracker) June 28, 2022
भारताचा डाव
या सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट फलंदाजी करताना २० षटकात ७ विकेट गमावत २२७ धावा केल्या. टीम इंडियासाठी दीपक हुडाने तुफानी फलंदाजी करताना शतक झळकावले. भारतासाठी संजू सॅमसन आणि इशान किशन सलामीला आले पण इशान किशन फ्लॉप ठरला. तो ३ धावा करून बाद झाला. यानंतर संजू सॅमसन आणि दीपक हुड्डा यांनी धमाकेदार फलंदाजी करत आयरिश गोलंदाजांची धुलाई केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. सॅमसन ४२ चेंडूत ७७ धावा करून बाद झाला. हुडाने ५५ चेंडूत शतक झळकावले. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो चौथा भारतीय ठरला. सूर्यकुमार यादव १५ धावा करून बाद झाला. हुडा ५७ चेंडूत १०४ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ९ चौकार आणि ६ षटकार मारले. कार्तिक आणि अक्षर पटेल दोघेही गोल्डन डकवर बाद झालवे. पंड्या १५ धावांवर नाबाद राहिला. आयर्लंडकडून मार्क एडेयरने सर्वाधिक ३ बळी घेतले.
दोन्ही संघांची Playing 11
आयर्लंड : पॉल स्टर्लिंग, अँड्र्यू बालबर्नी (कप्तान), गॅरेथ डेलनी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), जॉर्ज डॉकरेल, मार्क एडेयर, अँडी मॅकब्राईन, क्रेग यंग, जोशुआ लिटल, कोनर ओल्फर्ट
भारत : संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कप्तान), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, उमरान मलिक.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
