Share

Sanjay Raut : बंडखोर रस्त्यावर गद्दार फिरता कामा नयेत; संजय राऊतांचं शिवसैनिकांना आवाहन

Published On: 

अलिबाग : राज्यात सध्या शिवसेनेला धक्कावर धक्के बसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आहे. यानंतर शिवसेनेचा बुलंद आवाज असणारे खासदार संजय राऊत यांना ईडीकडून नोटीस मिळाली होती. जमीन घोटाळाप्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर आज संजय राऊत हे रायगडमधील अलिबाग येथे शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर जोरदार टोले लगावले आहेत.

या मेळाव्यात बोलताना संजय राऊत म्हणाले कि, बहुमत आहे ना? मग लपून का बसला आहात? एकनाथ शिंदे गटाला संजय राऊतांचा सवाल त्यांनी यावेळी बोलताना केला. हिंदूत्वाशी संबध नसलेलेही हे बंडखोरांसोबत पळून गेलेत. बाळासाहेब आणि ठाकरे कुटुंबियांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचे वाटोळं झालयं असा इतिहास सांगतो. राज्यात शिवसेना संपवण्याचं कारस्थान सुरू आहे. आम्हाला हिंदुत्व कुणीही शिकवू नये. केंद्राच्या बंडखोरांना विशेष सुरक्षा दिली जाणार आहे. हे गद्दार रस्त्यावर फिरता कामा नये, बाळासाहेबांनी सांगितलंय रस्त्यावर उघडं करून मारा असं आवाहन संजय राऊतांनी शिवसैनिकांना दिलं आहे.

दरम्यान, तसेच पुढे ते म्हणाले कि, 22 वर्ष दिघे साहेबांचे विचार आठवले नाहीत का?, ईडी पासून सुटका करुन घेण्यासाठी हे सर्व कट कारस्थान सुरु आहे. आम्हाला हिंदूत्व कुणी शिकवू नये, असं म्हणत राऊतांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ठाकरे आणि शिवसेना एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहे. कित्येक लोकांनी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला. नारायण राणे, छगन भुजबळ, गणेश नाईक गेले कुठेतरी गुलामच झाले. शिवसेना इथं आहे. नाव कशाला लावता असा सवाल संजय राऊतांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!