अलिबाग : राज्यात सध्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय. आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रायगडमधील अलिबाग येथे शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. 22 वर्ष दिघे साहेबांचे विचार आठवले नाहीत का?, ईडी पासून सुटका करुन घेण्यासाठी हे सर्व कट कारस्थान सुरु आहे. आम्हाला हिंदूत्व कुणी शिकवू नये, असं म्हणत राऊतांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
तसेच पुढे या मेळाव्यात बोलताना संजय राऊत म्हणाले कि, बहुमत आहे ना? मग लपून का बसला आहात? एकनाथ शिंदे गटाला संजय राऊतांचा सवाल त्यांनी यावेळी बोलताना केला. हिंदूत्वाशी संबध नसलेलेही हे बंडखोरांसोबत पळून गेलेत, अब्दुल सत्तारांचं हिंदुत्व धोक्यात आलं, याचं मला आश्चर्य वाटलं, असं म्हणत त्यांनी सत्तारांसह बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, बाळासाहेब आणि ठाकरे कुटुंबियांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचे वाटोळं झालयं असा इतिहास सांगतो. राज्यात शिवसेना संपवण्याचं कारस्थान सुरू आहे. आम्हाला हिंदुत्व कुणीही शिकवू नये. केंद्राच्या बंडखोरांना विशेष सुरक्षा दिली जाणार आहे. हे गद्दार रस्त्यावर फिरता कामा नये, बाळासाहेबांनी सांगितलंय रस्त्यावर उघडं करून मारा असं आवाहन संजय राऊतांनी शिवसैनिकांना दिलं आहे. ठाकरे आणि शिवसेना एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहे. कित्येक लोकांनी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला. नारायण राणे, छगन भुजबळ, गणेश नाईक गेले कुठेतरी गुलामच झाले. शिवसेना इथं आहे. नाव कशाला लावता असा सवाल संजय राऊतांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

