Share

Chandrakant Khaire : एकनाथ शिंदे जादूटोणा करतात, त्यांच्या तोंडात सतत पांढरी गोळी असते- चंद्रकांत खैरे

Published On: 

🕒 1 min read

जालना : महाराष्ट्रात राजकीय संघर्ष सुरू आहे आणि या संघर्षात नव्या राजकीय शैलीही पाहायला मिळत आहेत. राज्यात चालू असलेल्या सत्तानाट्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण बिघडलेल चित्र दिसत आहे. बंडखोर आमदार आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचे समर्थन करणारे शिवसैनिक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. अशातच आता शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी एक अजब विधान केल आहे. राज्यात सत्तांतर व्हावे यासाठी एकनाथ शिंदे आणि शिवसेना बंडखोर आमदारांना भाजपने ७००० कोटी रुपये दिल्याचा सनसनाटी आरोप शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

तर ज्या दिवशी शिवसेना पक्ष हायजॅक कराल त्या दिवशी महाराष्ट्रातील शिवसैनिक तुम्हाला जाळून टाकल्या शिवाय राहणार नाही असं धक्कादायक वक्तव्य सेनेचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी केलं आहे. जालन्यातील मोर्चात चंद्रकात खैरे आणि माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी ही खळबळजनक वक्तव्यं केली आहेत.

शिवसेना विरोधात बंड करणारे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल चंद्रकांत खैरे यांनी अजब दावा केला आहे. शिवसेना बंडखोर आमदारांना गुवाहाटीला घेऊन गेलेल्या एकनाथ शिंदेंना जादूटोणा येत असल्याचं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.

वैजापूर तालुक्याचे बंडखोर आमदार रमेश बोरणारे यांच्या मतदारसंघात शिवसेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी चंद्रकांत खैरे यांनी बोरणारे यांच्यासह एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले, त्या गुवाहाटीत काय चालू आहे, आमदारांना कसं बेकार करून ठेवलंय. त्यांच्यावर जादूटोणा करण्यात आला आहे. कारण एकनाथ शिंदे हे जादूटोणा करतात. त्यांच्या तोंडामध्ये सतत एक कोणतीतरी पांढरी गोळी असते. म्हणून त्यांनी जादूटोणा करून या लोकांना आपलंसं करून घेतलंय.

महत्वाच्या बातम्या :

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!